दत्तात्रय फाऊंडेशनचे उपक्रम
-
सामाजिक उपक्रम
- कातकरी वस्तीतील बालक महिला व तरुण वर्गासाठी विविध उपक्रम.
- कोविड सेंटर मधील कोरोना योद्धांचा सन्मान केला गेला.
- पोलीस, वाहतूक पोलीस, हॉस्पिटलमधील वॉर्ड बॉय मामा, अग्निशामक दलाचे कर्मचारी अशा विविध क्षेत्रातील बांधवांबरोबर स्नेहपूर्ण संबंध वाढवण्यासाठी राखी पौर्णिमा व भाऊबीज साजरी केली.
- पूरग्रस्त महाड, वादळग्रस्त चिखली गाव जिल्हा रत्नागिरी येथे आपत्तीग्रस्तांना अन्नधान्य व कपडे यांची मदत पुरवली.
- दापोली येथील वनवासी कल्याण आश्रमासाठी आदिवासी समाजातील सुमारे २०० कुटुंबांना अन्नधान्याची मदत पुरवली.
- श्री क्षेत्र महाबळेश्वर, सासवड आणि वेल्हा तालुक्यातील शाळांना कॉम्प्युटर साठी बॅटरी बॅकअप, विद्यार्थ्यांसाठी पाटी, पेन्सिल, वह्या व सॅक, इत्यादी शालेय साहित्य पुरवले.
- महिला सक्षमीकरण अंतर्गत महिलांना ब्युटी पार्लरचे, तसेच विविध पीठे बनवणे यांचे प्रशिक्षण दिले.
- आदिवासी महिलांना साड्या पुरवून त्यांच्याकडून गोधड्या शिवून घेतल्या.
-
सातत्याने चालणारे उपक्रम
- वृद्धाश्रमे व अनाथाश्रमे यांना अन्नधान्याची मदत.
- वेगवेगळ्या टेकड्यांवर वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवणे.
- नवरात्रीच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील सामान्यातील असामान्य अशा नऊ महिलांचा हिरकणी पुरस्काराने सन्मान केला जातो.
- रक्तदान शिबिरांचे आयोजन.
- प्राथमिक आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन.
- चैतन्य महिला उद्योजिका प्रदर्शन व विक्रीचे आयोजन.
- एक मे कामगार दिनानिमित्त समाजातील विविध क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पुरुषांचा सत्कार.
- आपत्तीग्रस्त व दुष्काळग्रस्त गावांना त्यांच्या गरजेनुसार (अन्नधान्य व कपडे इत्यादी) मदत करणे.
- गरजू महिलांना साड्या पुरवून विविध गोधड्या शिवून घेणे.
- दुष्काळग्रस्त व आपत्तीग्रस्त खेड्यातील बालक व तरुण वर्गासाठी गरजेप्रमाणे मदत करणे.
- पुणे जिल्ह्यातील आदिवासी बालक महिला व तरुणांसाठी गरजेप्रमाणे कार्यक्रम राबवणे.
- गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, दप्तर, वह्या इत्यादी गरजेनुसार पुरवणे.
-
वार्षिक उपक्रम
- सासवड व वेल्हे तालुक्यातील महिला आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक, आरोग्य, शारीरिक व मानसिक तसेच विविध उपक्रमांच्या साह्याने मदत करणे. उदा शालेय साहित्य पुरवणे, आरोग्य तपासणी, आहारावर मार्गदर्शन, मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने विविध कार्यशाळा आयोजित करणे.
कार्यक्षेत्र
पुणे सातारा व रत्नागिरी जिल्हे व आसपासच्या परिसरातील आदिवासी समाज तसेच ग्रामीण भाग शहरी भागातील विविध वसाहती.
|
|
|